
सामना प्रतिनिधी । बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात ८५ गावांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम होत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गावागावामध्ये शिवसैनिकांत नवचैतन्य आणि उत्साह संचारला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी माजलगाव, वडवणी, धारूर, केज, परळी, अंबाजोगाई या तालुक्यामध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला.
तब्बल ८५ गावामध्ये एकाचवेळी शिवसैनिकांच्या वतीने वृक्षारोपण केले जात आहे. आज सकाळी वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई या ठिकाणी प्राथमिक रूग्णालय, ग्रामिण रूग्णालय, प्राथमिक उपकेंद्र या कार्यालयाच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, दुपारच्या टप्प्यामध्ये परळी, माजलगाव या तालुक्यामध्ये वृक्षारोपण होत आहे. केवळ वृक्षारोपण केले जाणार नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली आहे.






























































