
सामना प्रतिनिधी । जळगाव
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने शहर शिवसेना कार्यालयाजवळ श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच थंडीपासून सरंक्षण व्हावे म्हणून गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
वंदनीय शिवसेनाप्रमुखांकडून समाजकारणाची शिकवण मिळालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी त्यांच्या स्मृतीदिनी समाज कार्याची जाण ठेवत गरजूंना ब्लँकेटचे वाटप केले. यावेळी संपर्कप्रमुख समाधान पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, शिवसेनेचे नगरसेवक गणेश सोनवणे, ईबा पटेल, किशोर भोसले, मानसिंग सोनवणे, महिला आघाडीच्या मंगला बारी, शोभा चौधरी, मनिषा पाटील, ज्योती शिवदे, राहूल नेतलेकर, जितेंद्र गवळी आदी उपस्थित होते.
बळीराम पेठ शाखेत प्रतिमा पूजन शनिवारी शिवसेनेच्या बळीराम शनिपेठ शाखच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विपिन पवार, विभागप्रमुख जितेद्र गवळी, शाखा प्रमुख ललित भोळे, निर्भय पाटील, हिमाशुं कव्हाणे, सनी सोनार, महेश पाटील, श्रीकांत गवळी, शुभम पाटकर, आदित्य बडगुजर, विशाल निकम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































