जनतेला फक्त पिण्याचे पाणी द्या; चंद्रशेखर राव यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संभाजीनगरमधील सभेत भाषण केले. या भाषणात चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्दे उपस्थित केले. चंद्रशेखर राव यांनी सगळ्यात महत्त्वाच्या पाण्याच्या समस्येला हात घातला. जनतेला फक्त पिण्याचे पाणी हवे आहे, असे ते म्हणाले.

चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची जोरदार चर्चा चालू होती. आपल्या भाषणाच चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवरही टीकास्र सोडले. महाराष्ट्रात इतक्या नद्यांचा उगम होतो. कुठल्या राज्यातून इतक्या नद्या वाहतात. देशाची आर्थिक राजधानी मुंबई जिथे आहे. मात्र, असे असूनही सरकार जनतेला प्यायचे पाणी देऊ शकत नाही? कृपा करून यावर विचार करा. जनता काय मागते? सोन्याची वीट थोडीच मागतेय? असा सवालच त्यांनी केला. जनतेला फक्त पिण्याचे पाणी हवे आहे, असेही ते म्हणाले.