हादरली धरणी…!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रंगनाथ कोकणे

तुर्कस्तानचा समावेश हा भूपंपाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात होतो. तुर्कस्तान हे चार भूगर्भीय प्लेटवर वसलेले आहे. एक जरी प्लेट हलली तर हाहाकार माजतो. 1999 मध्ये तुर्कस्तानात मोठा भूपंप झाला आणि त्यावेळी 17 हजार जण मृत्युमुखी पडले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती घडली असून तुर्कस्तान आणि सीरियात 7.8 रिश्टर स्केलच्या भूपंपाने मृत्यूचे तांडव घडले आहे. ग्लोबल वार्ंमग, गरजेपेक्षा अधिक उत्खनन, जंगलतोड, वितळणारे ग्लेशियर, महापूर, जंगलातील वणवा आदींमुळे पृथ्वीवरचे संतुलन बिघडले आहे. गेल्या तीन दशकांत नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. तुर्कस्तानसारख्या घटनांमधून दिला जाणारा निसर्गाचा इशारा समजून घ्यायला हवा.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (यूएसजीएस) गेल्या काही वर्षांमध्ये 5 किंवा त्याहून अधिक रिश्टर स्केल तीव्रतेचे मोठे भूपंप फारसे आलेले नाहीत. यूएसजीएसनुसार, 1970 पासून या प्रदेशात 6 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे फक्त तीन भूपंप झाले आहेत. या प्रदेशात शेवटचा मोठा भूपंप जानेवारी 2020 मध्ये झाला होता. भूपंप जितका जवळ असेल तितके नुकसान जास्त असते. तुर्कस्तानमध्ये आताचा भूपंप तुलनेने कमी खोलीतून आल्यामुळे तो अधिक विनाशकारी ठरला. नैसर्गिक घटनांमध्ये भूपंप ही एक अतिशय सामान्य घटना आहे, परंतु त्याचा पूर्वअंदाज बांधता येत नाही. भूपंपाची उत्पत्ती आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्याची वेळ यामधील काही सेपंदांचा लीड टाइम देणे शक्य आहे. भूपंपाचे तरंग प्रकाशाच्या वेगापेक्षा खूपच कमी प्रवास करतात. त्यांचा वेग 5 ते 13 कि.मी. प्रतिसेपंद असतो. त्यामुळे भूपंप सुरू होताच त्याचा शोध लागल्यास तो जमिनीवर येण्यापूर्वी केवळ काही सेपंदांपूर्वीच त्याची माहिती मिळू शकते. हा वेळ इतका कमी आहे की, एखाद्याला अलर्टही पाठवता येत नाही.

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूपंपात आतापर्यंत तब्बल चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु भूपंप होण्यापूर्वी परिसरातील पक्ष्यांमध्ये चलबिचल होत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
आशिया आणि युरोपचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱया तुर्कस्तानमध्ये भीषण भूपंपाचे एकामागून अनेक धक्के बसले आणि पाहता पाहता हजारो मोठमोठय़ा इमारती, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घरे कोसळून जमीनदोस्त झाली. तब्बल 7.8 रिश्टर स्केलच्या या भूपंपाचे वर्णन ‘विनाशकारी’ असे केले जात आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूपंपाचं हे संकट तुर्कस्तानसाठी भविष्यात आणखी मोठं आव्हान उभं करणारं ठरू शकतं. कारण अतिप्रचंड तीव्रतेच्या भूपंपामुळे काही इमारतींचा पाया कमकुवत झाला आहे.

अमेरिकी भूगर्भशास्त्र्ा सर्वेक्षणानुसार, भूपंपाचा पेंद्रबिंदू गाझियांटेपासून 33 किलोमीटर अंतरावर आणि नूरदगी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर होता. या शक्तीशाली भूपंपाची खोली 18 किलोमीटरवर होती. स्थानिक मदतकार्य करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम सुरू झाले. जवळच्या युरोपीय देशांतूनही मदतीचा ओघ सुरू झाला. नेदरलँड आणि रोमानियाचे पथकही तुर्कस्तानात दाखल झाले. दुसरीकडे हिंदुस्थानदेखील मोठय़ा प्रमाणात मदत रवाना करत आहे. बचाव पथकेदेखील तैनात केली जाणार आहेत. सध्याचा काळ एकजुटीचा असून त्याच्या मदतीने तुर्कस्तानातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान कमी करता येणे शक्य आहे.

1999 मध्येही तुर्कस्तानात असाच मोठा भूपंप झाला आणि त्यावेळी 17 हजार जण मृत्युमुखी पडले होते. आताच्या भूपंपानंतर 1939 मध्ये तुर्कस्तानला बसलेल्या भूपंपाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत. त्या भूपंपामध्ये सुमारे 30 हजार जणांचा मृत्यू झाला होता. 1900 पूर्वी तुर्कस्तानमध्ये भूपंपामुळे 6 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 1900 ते 1999 या काळात सुमारे 70 हजार मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

तुर्कस्तानचा समावेश हा भूपंपाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात होतो. यंदा केवळ भूपंपाची पुनरावृत्तीच झाली नाही, तर प्रथमच बराच काळ जमीन हलत असल्याचे दिसून आले आहे. एक-दोन मिनिटांच्या भूपंपाचे धक्के इमारती सहन करू शकतात, परंतु तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ जमीन हादरत असेल तर कच्च्या इमारतींना वाचवणे कठीणच ठरते. अर्थात सर्वच इमारती धराशायी झाल्या असे नाही. त्यामुळे भूपंपानंतरचे बचाव कार्य आटोपल्यानंतर ज्या इमारती उभ्या आहेत, त्यांच्या मजबुतीचे आकलन करायला हवे. 2017 मध्ये इराण आणि इराकच्या सीमेवर भूपंपाचे धक्के बसले होते तेव्हा इराकचे कुर्दिश शहर आणि इराणमध्ये करमान शहा प्रांतात भूपंपाची नोंद झाली. त्यात 630 जणांचा मृत्यू झाला आणि 8 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. ताज्या भूपंपात सीरियातील अलेप्पो येथील प्राचीन काळातील स्थळांचीदेखील हानी झाली आहे. या भूपंपाने तुर्कस्तानचे आणि सीरियाचे नागरिक धास्तावले आहेत. इतिहासातील भूपंपाच्या घटना आणि ताजा विनाशकारी भूपंप या पार्श्वभूमीवर तुर्कस्तान, सीरियासारख्या देशांत भविष्यात घराचे बांधकाम या गोष्टींचा सारासार विचार करूनच व्हायला हवे, जेणेकरून भविष्यातील हानी कमी राहू शकते.

वास्तविक, भूपंपाच्या तीव्रतेचा आकडा जमिनीतून बाहेर पडलेली ऊर्जा दर्शवतो. या भूपंपाच्या धक्क्यांमुळे पर्वत किती हादरला आणि किती दूरपर्यंत हादरला हेही यावरून दिसून येते. भूपंपाची तीव्रता जसजशी वाढते तसतशी त्यातून बाहेर पडणारी ऊर्जाही वाढते. भूपंपाची तीव्रता एक बिंदूने वाढल्यास त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा 32 पटीने वाढते. उदाहरणार्थ, 7 तीव्रतेचा भूपंप 6 तीव्रतेच्या भूपंपापेक्षा 32 पट जास्त ऊर्जा सोडतो. 8 रिश्टर स्केलचा भूपंप 6 रिश्टर स्केलच्या भूपंपापेक्षा एक हजार पट जास्त ऊर्जा सोडतो.

तुर्कस्तान आणि त्याच्या आसपासचा प्रदेश अॅनाटोलियन प्लेटवर वसलेला आहे. तुर्कस्तान 6 टॅक्टॉनिक प्लेटस्नी वेढलेला आहे. अॅनाटोलियन प्लेटच्या पूर्वेला पूर्व अॅनाटोलियन फॉल्ट आहे, तर डावीकडे ट्रान्सफॉर्म फॉल्ट आहे. दक्षिण आणि नैऋत्येस आफ्रिकन प्लेट आहे. याशिवाय तुर्कस्तानच्या उत्तरेला युरेशियन प्लेट आहे. या प्लेट्स घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे या प्लेट्समध्ये घर्षण होते. त्यामुळे भूपंपाचे जोरदार धक्के जाणवतात. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, तुर्कस्तानच्या आसपासची परिस्थिती आशियातील हिमालयीन प्रदेशापेक्षा वेगळी आहे. उत्तर अॅनाटोलियन प्लेटच्या अभ्यासानंतर असे लक्षात आले आहे की, अॅनाटोलिया युरेशियन प्लेटपासून वेगळे झाले आहे. या प्लेट्सवर अरेबियन प्लेटचा दाब वाढत असल्याचे काही अभ्यासातून समोर आले आहे.

तुर्कस्तानातील जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी संपूर्ण जगभरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. हिंदुस्थाननेही तुर्कस्तानला मदत केली आहे. येणाऱया काही दिवसांत तेथील परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करू या, परंतु यानिमित्ताने अलीकडील काळात वाढत चाललेल्या नैसर्गिक आपत्तींविषयीची चिंता पुन्हा गडद झाली आहे. याचा कुठे ना कुठे जागतिक तापमान वाढीशी आणि मानवाच्या विकासासाठीच्या हव्यासाशी संबंध आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

ग्लोबल वार्ंमग, गरजेपेक्षा अधिक उत्खनन, जंगलतोड, वितळणारे ग्लेशियर, महापूर, जंगलातील वणवा आदींमुळे पृथ्वीवरचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणासंबंधीच्या अनेक अभ्यासांतून धक्कादायक निष्कर्षही समोर आले आहेत. गेल्या तीन दशकांत नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. भूपंपाची संख्यादेखील वाढली आहे. हिंदुस्थानचे उदाहरण घ्यायचे झाल्यास जोशीमठकडे पाहता येईल. तेथील स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही. घराला आणि जमिनीला भेगा पडत आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून ‘जोशीमठ वाचवा’ असे आवाहन करत होते, परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, माध्यमांतून हा गंभीर प्रश्न जगासमोर आला तेव्हा प्रशासनाला जाग आली. हिंदुस्थानच्या भूगर्भात असणारी प्लेट ही तुर्कस्तानसारखी संवेदनशील नाही. तरीही हिंदुस्थानी प्लेट घसरत आहे आणि हिमालयाची उंची वाढत आहे. लहानसहान भूपंपाची या भागात नित्याने नोंद होत आहे. काही दिवसांपूर्वीच राजधानी दिल्लीला भूपंपाचे धक्के बसले होते. हिमालयामध्ये शक्तीशाली भूपंपाची भविष्यवाणी यापूर्वीच करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला पाकिस्तानातील महापूर हा भयावह होता.

या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानातील विनाशकारी संकटातून बोध घेऊन हिंदुस्थानने सावध होण्याची गरज आहे. याखेरीज जगभरातील देशांनी एकत्र येऊन पृथ्वी आणि मानवाच्या भविष्यासाठी सामूहिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. एका ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली तर दुसऱया ठिकाणी त्याचे दुष्परिणाम पाहावयास मिळतात. युरोपची आपत्ती असो, आशिया खंडातील आपत्ती असो, सर्वांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. विकासासाठी पृथ्वीच्या भूगर्भावर किती आघात करायचे याचा विचार करायला हवा. निसर्ग अभ्यासक, भूगर्भशास्त्रज्ञ, सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ या सर्वांच्या सूचना, शिफारसी यांचा उपहास करण्याची आणि विकासाचे शत्रू म्हणून त्यांना दुर्लक्षित करण्याची भूमिका बदलायला हवी.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)