Photo – हिनाचे ग्लॅमरस फोटोशूट, चाहते फिदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या स्टायलिस्ट लूकबाबत कायम चर्चेत असते. हिना खानने ईदच्या निमित्ताने तिचे सुंदर फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून पेस्टल ग्रे कलरच्या सूटमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

हिनाने ईदच्या मुहूर्तावर तिच्या इंस्टाग्रामवर हा लूक शेअर केला आहे आणि हा सूट तिने फॅशन हाउस RAR Designs मधून घेतला आहे.

हिनाने पेस्टल ग्रे आणि पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट यावेळी घातला असून त्यावर सोनेरी धाग्यांचे झरीचे काम केलेली हेवी एम्ब्रॉयडरी दिसत आहे.

हिनाच्या या सूटला डीप व्ही नेकलाइन देण्यात आली आहे, ज्यावर जरीचे काम केले आहे.

हिनाने हा कुर्ता पेस्टल ग्रे कलरच्या फ्लोय लाँग स्कर्टसोबत मॅच केला आहे. जो गोल्डन प्रिंट्सने बनलेला दिसत आहे.

तिने आपला लूक पूर्ण करताना ओढणी घेतली आहे.त्याचबरोबर गळ्यात पांढरा चोकर नेकलेस, मॅचिंग कानातले घातले आहेत. 

मेकअपसाठी ब्लॅक आयलाइनर, बेरी रेड लिप्स, सिल्व्हर आय-शॅडो वापरले असून केस बांधले आहेत. 

कुर्ताच्या हेमलाइनवर फुलांच्या नक्षीसह टॅसेल्स जोडले असून ते छान दिसत आहेत. तर कुर्त्याच्या मागच्या बाजूला व्ही कट आहे.  

हिनाचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.