हुंडाई क्रेटा कारला अपघात: दोन ठार, तीन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अपघातामध्ये ३ महिला आणि एक लहान मुलगा मृत्यूमुखी पडला आहे.

सामना प्रतिनिधी । नांदेड

किनवट तालुक्यातील बोधडी येथील काही युवक हिमायतनगर ते भोकर फाटा हा रोड अत्यंत खराब असल्यामुळे हदगांव मार्गे माळेगांव यात्रेला जात असतांना त्यांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात अजय गेडाम हे जागेवरच मृत्यूमुखी पडले तर योगेश शेळके याचा दवाखान्यात मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

किनवट तालुक्यातील बोधडी येथून माळेगाव यात्रेस जाण्यासाठी बोधडी येथील पाच मित्र नांदेडकडे आपल्या हुंडाई कंपनीच्य क्रेटा कारने काल दुपारी निघाले. इस्लापूरमार्गे हिमायतनगरपर्यंत आले. दरम्यान संभाजीनगर- आदिलाबाद महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे गाडी चालवण्यास अत्यंत त्रास होत होता. हिमायतनगरपासून भोकर फाट्यापर्यंत या पेक्षाही रस्ता खराब असल्याचे समजल्यामुळे त्यांनी हदगांव वारंगामार्गे जाण्यासाठी गाडी हदगांव मार्गे वळवली.

हदगांव पासून राष्ट्रीय राज्यमार्गाचे बरेच काम झाल्यामुळे येथून त्यांची गाडी सुसाट जात असतांनाच अचानक रोडवर आलेल्या कुत्र्याला वाचवतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांच्या कारने दोन पलट्या खाल्या. त्यांच्या एम.एच.२६-बीसी-६३२७ क्रमांक असलेल्या गाडीचा हदगावपासून १५ किलोमीटरवर बरडशेवाळा गावाजवळ अपघात झाला. या अपघातात अजय गेडाम यांचा जागेवरच तर योगेश शेळके यांचा डोक्याला मार लागल्यामुळे त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असून, पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले होते. यातील जखमीची नावे बंटी राम पाटील, राजेश आत्राम, बंटी डोंगरे अशी आहेत.

सदरील घटनास्थळ हे मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वडजे करीत आहेत.