
कोयत्यांचा नंगानाच व गोळय़ा घालून खून अशा दोन वेगवेगळय़ा घटना अवघ्या काही तासांत घडल्याने सातारा हादरला आहे. पोवई नाक्यावर सयाजीराव विद्यालयाजवळ काल रात्री आठच्या सुमारास काही तरुणांनी हातात कोयते नाचवत दहशत माजवली. पोलिसांनी त्यातील पाचजणांना ताब्यात घेतले. या दहशतीतून सावरण्यापूर्वीच मध्यरात्री वाढे फाटय़ावर एकाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सयाजीराव विद्यालयाजवळ कोयत्यांचा थरार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नातील आणखी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेनंतर काही तासांतच रात्री एकच्या सुमारास शहरालगत महामार्गावरील वाढे फाटय़ाजवळच्या एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला. त्यामध्ये येथील शुक्रकार पेठेतील अमित भोसले हा युकक ठार झाला. डोक्यात गोळय़ा घालून त्याची हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.
काढे फाटय़ानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱया क येणाऱया मार्गाकर मोठय़ा प्रमाणाकर हॉटेल क्यकसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्यापि समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाक घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल क्याकसायिकांमध्ये भीतीचे काताकरण निर्माण झाले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.






























































