
सामना प्रतिनिधी । जालना
जालना औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना मारहाण करुन जबरीने लुटमार करणार्या दोघांना चंदनझिरा पोलीसांनी तपासाचे चक्रे फिरवून २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील कामगार रोषन कुमार सुरेश यादव कंपनीत काम करतो. ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तो आणि त्याचा मित्र जयकांतकुमार मंडल हे एसआरजी कंपनीजवळ असलेल्या किराणा दुकानामध्ये किराणा सामान आणण्यासाठी जातअसतांना पाठीमागून आलेल्या चार चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन त्यांना मारहाण केली. व त्यांच्या खिशातील ३ हजार २०० रुपये काढून घेतले. यावेळी फिर्यादीने आरडाओरड केली असता चोरटे पळून गेले. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सदर गुन्ह्याचे सवयीच्या सराईत गुन्हेगारांबाबत माहिती काढणे कामी पोलीस कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भंडागे व भरत कडूळे यांचे एक पथक नेमुन त्यांना आदेश दिले होते, त्याप्रमाणे माहिती घेत असतांना उमेश कुटे रा. नुतनवसाहत हा गुन्हा घडलेल्या दिवशी औद्योगिक वसाहतमध्ये फिरत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाल्यावर उमेश कुटेच्या घरी पथक गेले असता तो घटना घडल्यापासून घरी न आल्याने व तो घरी मिळून न आल्याने त्याचा शोध् घेऊन त्यास जुना जालना भागातून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विचारपुस केली असता गुन्हा केल्याची कबुली देत त्याचा साथीदार आकाश कांबळे असे दोघांनी मिळून केली. तसेच आकाश यास सतकर कॉम्पलेक्स समोरुन ताब्यात घेतले त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील जबरीने काढून घेतलेले नगदी पैसे व चोरलेले तीन मोबाईल १२ हजार ६०० रुपयांचे व गुन्ह्यात वापरलेल्या टीव्हीएस कंपनीची लाल रंगाची मोटार सायकल असा एकुण ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चोरट्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस कर्मचारी राम शिंदे, नंदु ठावूâर, अनिल काळे, कृष्णा भडांगे, भरत कडुळे व नंदकुमार दांडगे यांनी केली आहे.




























































