
पंजाबमध्ये अशांतता पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अमृतसर पोलीस आणि पेंद्रीय एजन्सी यांच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-कश्मीरचे रहिवासी आहेत. या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन आयडी, दोन हँड ग्रेनेड, दोन मॅगझिनसोबत एक पिस्तूल, 24 काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डेटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत. या दहशतवादी मॉडय़ूलला ‘लश्कर-ए-तोयबा’चे सक्रिय सदस्य फिरदोस अहमद भट सांभाळत होता.

























































