
वेल्डिंगचे काम सुरू असताना बॉयलरचा स्फोट झाल्याने टायर कारखान्यात भीषण आग लागली. या आघीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे परिसरात दूरवर धुराचे लोळ पसरले होते.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील शेखपुरा औद्योगिक क्षेत्रात रविवारी संध्याकाळी हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी कारखान्यात सात कामगार काम करत होते. गंभीर भाजल्यामुळे दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच जणांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारखान्यात अपघात झाला त्या कारखान्याचे उद्घाटन 19 ऑक्टोबर रोजीच झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
























































