संकटाच्या काळातही मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांसोबत, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले! – उद्धव ठाकरे

मनोहर जोशी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष होतेच, पण त्याही पेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. कोणताही पक्ष किंवा व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण संकटाच्या काळातही मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांसोबत, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनावेळा बाळासाहेबांना अटक झाली होती. तेव्हा बाळासाहेबांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते. जिवाला जीव देणारे शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून गेले. शिवसेना, शिवसेना कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाच्यावतिने मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी कळात उद्धव ठाकरे यांनी नियोजित विदर्भ-मराठवाडा दौरा रद्द केला. त्यांनतर ते मुंबईकडे रवाना झाले. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला! – नितीन गडकरी

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते. त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन आजही तरुण शिवसैनिक काम करत आहेत. जिवाला जीव देणारे कार्यकर्ते त्यावेळीही होते आणि आजही आहेत. म्हणून शिवसेना ही प्रत्येकवेळी संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते. आजही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ती संपत नसून वाढतेय. याचे कारण या सर्व तमाम नेत्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शून्यातून विश्व निर्माण करणारे मनोहर जोशी लढवय्ये, कडवट शिवसैनिक होते! – संजय राऊत

आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, सदैव शिवसेना आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा कडवट शिवसैनिक आज हरपला. मनोहर जोशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती!”, असे ट्विट शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.