उद्धव ठाकरे यांचा झंझावात आता छत्रपती संभाजीनगरात, 12 फेब्रुवारीला जनतेशी साधणार संवाद

शिवसेना (उद्ध बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहे. सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी गंगापूर -रत्नपूर, वैजापूर, कन्नड- सोयगाव , छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी ते संवाद साधणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता विमानाने छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन होईल. दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील, त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड हे उपस्थितत राहणार आहे.