उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला असला तरी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू का होईना वाढ होत चालली असून धरणाच्या पाण्याने 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.

उजनीच्या वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात उशिरा का होईना जोरदार पावसाला सुरुवात झाली होती या धरणापैकी खडकवासला, कलमोडी, आंध्रा, हे प्रकल्प भरले असून त्या धरणासह आणखी तीन अशा सहा धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

शनिवारी दिवसभर या १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वरचेवर वाढ होत असून सध्या तो 9 हजारांच्या पुढे गेला आहे. वडिवले धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. तर इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे लवकरच बाकी धरणातून मोठ्या प्रमाणात उजनीत विसर्ग येण्यास सुरुवात होणार आहे.

सध्या उजनीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे
एकुण पाणीसाठा – 494.315 मी.
एकुण पाणीपातळी – 2561.27 दलघमी
उपयुक्त पाणीपातळी – 758.46 दलघमी
टक्केवारी – +49.99%
दौंडमधून येणारा विसर्ग – 11365 क्युसेक