
गेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत अंतिम लढतीत पराभवाचा धक्का देणाऱया बांगलादेश युवा संघाचा हिशेब हिंदुस्थानच्या छोटय़ा शेरांनी काळ रात्री चुकता केला. केवळ 111 धावांत गुंडाळत युवा टीम इंडियाने उपांत्यपूर्व लढत 5 विकेट आणि 115 चेंडू राखून बांगला संघाचा दणदणीत पराभव केला आणि मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला.
14 धावांत 3 फलंदाज बाद करणारा हिंदुस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज रविकुमार या विजयाचा शिल्पकार ठरला. हिंदुस्थानी संघाला आता उपांत्य फेरीत बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघाशी सामना करायचा आहे. ही महत्त्वपूर्ण लढत 2 फेब्रुवारीला अँटिग्वात खेळवली जाणार आहे.
वेस्ट इंडीजमध्ये खेळला जाणारा अंडर 19 वर्ल्डकप आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरी गाठणारा हिंदुस्थान हा चौथा संघ ठरला. उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने विक्रमी दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
हिंदुस्थानव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे संघही उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हिंदुस्थानी युवा संघासाठी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही महत्त्वाचा होता. कारण दोन वर्षांपूर्वी बांगलादेशनेच हिंदुस्थानचे 19 वर्षांखालील विश्वविजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. आता उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानने बांगलादेशचा पराभव करून त्या पराभवाचे उट्टे फेडले आहे.
युवा टीम इंडिया 10व्यांदा अंतिम फेरीत
वेस्ट इंडीजमध्ये खेळला जाणारा अंडर 19 वर्ल्डकप आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरी गाठणारा हिंदुस्थान हा चौथा संघ ठरला. उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. हिंदुस्थानने विक्रमी दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हिंदुस्थानव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. सर्वात धक्कादायक कामगिरी अफगाणिस्तानची होती. त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला.

























































