ठाणे संघाने उडवला कांगारूंचा धुव्वा

22
thane-team-australia-team

सामना प्रतिनिधी । ठाणे

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केल्यानंतर येथे आज प्रथमच ठाणे विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा सामना रंगला. 16 वर्षांखालील गटात झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात ठाणे सेंटर संघाने 3 गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. मात्र दोन्ही संघांच्या फटकेबाजीने उपस्थितांची मने जिंकली. ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

ठाण्यातील ठाणे सेंटर संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा 35 षटकांचा सराव सामना दादोजी कोंडदेव येथे झाला. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने अप्रतिम फटकेबाजी केली. मात्र ठाण्याच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. दादोजी कोंडदेव येथील धावपट्टी ही उत्तम दर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलियात देणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक ब्रूस कूड यांनी आवर्जून नमूद केले. याकेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या