‘यूपीए’च्या काळात 12 हवाई हल्ले केले – खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खरगे 42 हजार मतांनी पिछाडीवर आहे

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस-यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकालात तब्बल 12 ‘एअर स्ट्राइक’ करण्यात आले होते. मात्र काँग्रेसने त्याचा वापर राजकारणासाठी कधीही केला नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज सांगितले. हावेरीमध्ये पक्षाच्या रॅलीला संबोधित केल्यानंतर हुबळी विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत जवानांनी सीमेपार जाऊन तीन वेळा हवाई हल्ले केले, पण तिसऱया स्ट्राइकबद्दल आपण काही सांगणार नाही, असे शनिवारी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना खरगे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

मोदी यांच्याकडे विकासाबाबत सांगण्यासारखे काही नाहीच. त्यामुळे त्यांच्या सरकारने शहीद जवानांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा राजकारणासाठी वापर चालवला आहे, असा स्पष्ट आरोप खरगे यांनी केला.