
अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली आहे. सॅन दिएगो परिसरात गुरुवारी एक लहान विमान कोसळले. निवासी परिसरात विमान कोसळल्याने सुमारे 15 घरांना आग लागली. सुदैवाने घटनेवेळी घरी कुणी नव्हते.मात्र विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे विमान हा अपघात झाला.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने दिलेल्या माहितीनुसार, सेस्ना 550 हे विमान मॉन्टगोमेरी-गिब्स एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ कोसळले. विमानात 8 ते 10 प्रवासी होते, सर्वांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
आमच्याकडे सर्वत्र जेट इंधन आहे. या सर्व घरांचा शोध घेणे आणि नागरिकांना सुखरुप बाहेर काढणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे सहाय्यक अग्निशमन प्रमुख डॅन एडी यांनी सांगितले. घटनेच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती असे, एडी यांनी नमूद केले.