
ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका रद्द केली आहे. ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी होऊ नये, अशी याचिका मुस्लीम पक्षाने दाखल केली होती. मात्र, हिंदू पक्षाची याचिका सुनावणीयोग्य असून त्यावर सुनावणी होऊ शकते, असे मत नोंदवत न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका रद्द केली आहे.


























































