…रुग्णालयात कुत्र्याची पिल्ले जन्माला येतात म्हणणारे आप आमदार अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील रुग्णालयांत माणसाची नाही, कुत्र्याची पिल्ले जन्माला येतात, असे खळबळजनक विधान आपल्या कार्यकर्त्यांच्या सभेत करणारे दिल्लीतील आम आदमी पक्षाचे माजी मंत्री आणि आमदार सोमनाथ भारती यांना अमेठी पोलिसांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अटक केली आहे. त्याआधी भारती यांच्यावर रायबरेली सिंचन विभागाच्या गेस्ट हाऊसवर भाजप आणि हिंदू युवा वाहिनीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. दिल्लीचे आमदार भारती रायबरेलीतील रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी उत्तर प्रदेशात आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर अमेठी पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांची रवानगी अमेठीला केली आहे. रायबरेलीत भारती यांच्यावर संतप्त निदर्शकांनी शाईफेक झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांनी पोलीसांशी जोरदार वाद घातला. भारती यांच्याविरोधात जगदीशपूर पोलीस स्थानकामध्ये कलम 505 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.