विद्यार्थी व शिक्षकांना लस दिल्याशिवाय परीक्षा नकोच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लस दिल्याशिवाय परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने आमदार कपिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. कोरोनाची डय़ुटी करताना आतापर्यंत 150 हून अधिक शिक्षकांना प्राण गमवावा लागला असून कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांची संख्या एक हजाराहून जास्त आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शिक्षकांचा फ्रंटलाईन वर्कर्समध्ये समावेश करण्याची सूचना केली आहे. मात्र अद्यापही सरकार याबाबत निर्णय घेत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. अशा काळात जर लसीशिवाय परीक्षा घेतल्या तर विद्यार्थी शिक्षकांना कोरोनाचा धोका आहे, असे आमदार कपिल पाटील यांनी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.