बडोद्यातील दत्तस्थान – गरूडेश्वर

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरूदेव दत्त ।।

गरूडेश्वर हे स्थान बडोदा गुजरातपासून 70 कि. मी अंतरावर आहे. बडोद्याहून 1 किंवा 2 तास गरूडेश्वरला जायला लागतात. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेले श्री दत्तात्रेय अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्वामींचे समाधी स्थान आहे. माणगावाचा हा पावन देह धारण करणारा संत अथवा संन्यासी स्वामी महाराज गरूडेश्वरला समाधी घेण्यास का आला? हे नियतीलाच माहीत. स्वामींचे नर्मदा नदीवर नितांत प्रेम होते. नर्मदा नदीवर स्वामींनी स्तुती लिहिली आहे.

आई नर्मदा नदीच्या उत्तर किनारी दिव्य, शांत आणि अत्यंत सुंदर असे आहे. इथे श्री दत्त अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांच्यामुळे दिव्य स्वरूप व सुंदर स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वामी महाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या तपस्यामुळे त्यांच्या साधनेमुळे दिव्य स्वरूप प्राप्त झाले.

garudeshwar-temple

पुराणामध्ये भगवान श्री विष्णूंचे वाहन गरूडेश्वर हे भुकेले होते ते आकाश मार्गावरून जात असताना त्यांनी खाली पाहिले. तेव्हा त्यांना एक हत्तीसारखे शरीर असलेला एक देव गजासुर असुर योनीच्या मुक्तीसाठी नर्मदा आईच्या किनारी भगवान श्री शंकर त्यांची प्रार्थना करत होते. आई नर्मदा नदीची सुद्धा प्रार्थना करत होते. गरूडजी हे भुकेने व्याकुळ होते. त्या देह असलेल्या गजासुराला भक्षणासाठी चोचीमध्ये घेऊन त्यांनी उडवून एक बाजूला असलेल्या पर्वतावर नेले आणि त्यांचे भक्षण करू लागले. पूर्ण भक्षण करून गरूडेश्वर यांची भूक पूर्ण भागली आणि त्या गजासुराचे डोके चोचीमध्ये घेऊन उडू लागले आणि ते डोके चोचीतून निसटले आणि नर्मदा नदीमध्ये पडले. आणि नर्मदा नदीमधून ते डोके एक दिव्य मनुष्य ऋषींच्या स्वरूपात निर्माण झाले आणि तेच दिव्य स्वरूप मनुष्य गजासुर हे श्री भगवान श्री शंकर त्यांची प्रार्थना करू लागले. त्यांची साधना करू लागले. एक दिवस भगवान श्री शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी गजासुराला वर मागायला सांगितला. त्यावर गजासुर म्हणाले, तुम्ही मला एकच वर द्या. ज्याला मुक्ती हवी असेल त्याला तुम्ही इथे द्या आणि तुम्ही सदैव इथे निवास करा आणि सर्वांना दर्शन द्या.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या