वडूजमध्ये गद्दारांच्या प्रतिमांना मिरच्यांची धुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे आशीर्वाद व शिवसैनिकांच्या परिश्रमांतून मंत्री, आमदार झालेल्या एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई व महेश शिंदे या सातारा जिल्ह्यातील तीन गद्दारांच्या प्रतिमांना उलटे टांगून संतप्त शिवसैनिकांनी मिरच्यांची धुरी दिली.

खटाव तालुक्यातील वडूज येथे आज दुपारी शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे, शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी 80 वर्षांच्या सीताबाई पालवे यांनी शिवसेनेचे समर्थन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

ज्येष्ठ शिवसैनिक हणमंत घाडगे, महेश गोडसे, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, विक्रम गोडसे, संतोष दुबळे, किशोर गोडसे, वैभक तोडकर, मंगेश मोहिते, मधुकर मोहिते, अप्पाजी खुडे, अजय देवकर, हणमंत देवकर, विशाल चव्हाण, फिरोज मुलाणी, चंद्रकांत साठे, महिला आघाडीच्या राणी काळे, दिलशाद सलीम तांबोळी, प्रमिला दुबळे, सीताबाई पालके, प्रियांका दुबळे, सलमा शेख, संध्या देशमुख, धनश्री इनामदार, कल्पना गुरव, सुनीता साठे, दीपाली माने, सीमा उमापे, कांताबाई देशमुख, जयश्री पवार, साधना माने, रेखा कोळी यांनी आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदविला.