सरंबळ येथे वर्षावास कार्यक्रम

10
सरंबळ : वर्षावास कार्यक्रमात प्रवचन देताना अमोल पावसकर सोबत अन्य मान्यवर (काशिराम गायकवाड)

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ, मुंबई, तालुका शाखा कुडाळ व सरंबळ बौध्द सेवा संघ, मुंबई, ग्रामीण शाखा सरंबळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरंबळ येथे नुकताच ‘वर्षावास’ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सहदेव जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. बुध्दपूजा पाठ होऊन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे औचित्य साधुन सरंबळ जाधववाडी येथील विकास जाधव, रामदास जाधव, आकाश जाधव, निखिल जाधव या पदवीधर विद्यार्थ्यांचाही यशोचित गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित असेलेले सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ कें य समिती मुंबईचे हिशोब तपासनिस तथा भारतीय रिझर्व बँक ऑॅफ इंडियाचे असिस्टंट मॅनेजर आयु. गोपाळ लक्ष्मण जाधव यांचा सेवानिवृत्तीपर उपस्थितांच्या हस्ते पुष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमानिमित्त आयु.अमोल दिगंबर पावसकर यांनी बुध्दपुजेचे महत्व या विषयावर प्रवचन दिले. यावेळी या कार्यक्रमास सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ कुडाळ शाखेचे अध्यक्ष पांडुरंग कदम, सचिव सत्यवान कदम, उपसचिव अविनाश चेंदवणकर, उपासक सहदेव कदम, सुरेश तांबे, गोपाळ जाधव, सदानंद पावसकर, सिध्दार्थ नारिंग्रेकर, अभिजित बावकर, बाबुराव चेंदवणकर, पंकज कदम, महिला सदस्या विशाखा पावसकर, सरंबळ ग्रा.प.चे सदस्य दिपक जाधव, सरंबळ बौध्द सेवा संघ ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्रावण जाधव, उपाध्यक्ष किशोर जाधव, सचिव संदिप जाधव, खजिनदार दिपक जाधव व सर्व संघाचे पदाधिकारी तसेच रमाई महिला संघाच्या अध्यक्षा, सचिव व सर्व पदाधिकारी व वाडीतील सर्व बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ग्रामीण शाखेचे सचिव संदिप जाधव यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या