बुलेट ट्रेनविरोधात वसईकरांची वज्रमूठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वसई

केंद्र व राज्य सरकारने वसई तालुक्यावर कोस्टल कॅारिडोर, बुलेट ट्रेन, रेल्वे कॅारिडोर, औद्योगिक क्षेत्र आदी विविध प्रकल्प लादले आहेत. विकासाच्या नावाखाली वसईतील हरितपट्टा नष्ट केला जात असल्याने भूमिपुत्रांनी या प्रकल्पांना विरोध केला आहे. यासाठी वसई येथे आयोजित एल्गार सभेला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

एमएमआरडीएने तयार केलेला प्रारूप आराखडा येथील स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्याला विरोध होत आहे. शिवाय बुलेट ट्रेन प्रकल्प वसई विरारकरांच्या कोणत्याही फायद्याचा नसताना स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचा डाव प्रशासनाने आखल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, भूमीसेनाचे संस्थापक काळूराम धोदडे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू आदी उपस्थित होते.

भाजप सरकार गरीबांचे नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. ते देशाचे खरे नटसम्राट आहेत. भाजप सरकार गरीबांचे नाही. त्यांना केवळ अंबानी,  अदानी आदी बडय़ा उद्योजकांच्या विकासाचे पडले आहे, अशी टीका आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली.