Video – सुसाट निघाला, गाडीवर आपटला; टपावर जाऊन पडला

वसईत कार आणि दुचाकी अपघाताचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओत कार वळण घेत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी स्वाराने कारला जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. वसई पश्चिम माणिकपूर येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी रात्री ही अपघाताची घटना घडली आहे.

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पेट्रोलपंपाजवळ इनोवा कार वळण घेत असताना भरधाव वेगात येणारी दुचाकी कारला धडकते. या धडकेच्या वेळी दुचाकीचा वेग इतका अधिक होता की, दुचाकीस्वार कारला धडकून थेट तिच्या टपावर पोहोचला. मात्र या अपघातात त्याला कोणतीही इजा झाली नाही. हा अपघात पाहून घटनास्थळी जवळ असलेले लोक दुचाकीस्वाराच्या मदतीला धावून आले होते. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या