Vastu Tips – जाणून घ्या बेडरुमसाठी या महत्त्वाच्या वास्तू टीप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे बेडरुम. या खोलीत आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो. महिलांसाठी किचननंतर जर कोणती जिव्हाळ्याची जागा असेल तर ती बेडरुम असते. त्यामुळे त्या बेडरुमच्या सजावटीकडे देखील जास्त लक्ष देत असतात. मात्र बेडरुम सजवताना वास्तू नुसार काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही.

बेडरुमसाठी काही वास्तू टीप्स –

1) बेडरुममध्ये कधीच देव्हारा ठेवू नये. देव्हारा हा हॉलमध्ये ठेवल्यास उत्तम. देवाचे फोटोही बेडरूममध्ये लावू नये.

2) बेडरुममध्ये कोणताही रागिट मुद्रेचा फोटो, हिंसक प्राण्यांचे फोटो किंवा चित्र ठेवू नये. अशाने तेथील वातावरण बिघडण्याची शक्यता असते.

3) बेडरुममध्ये आरसा बसवताना त्यात बेड दिसणार नाही अशा प्रकारे बनवावा. किंवा मग जागे अभावी जर आरश्यात बेड दिसत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आरश्यावर पडदा टाकावा.

4. बेडरुमच्या भिंतींवर पूर्वजांचे फोटो लावू नये.

5. बेडच्या डोक्यावरील भिंतीवर कुटुंबीयांचे तसेच स्वत:चेही फोटो लावू नयेत.

6. बेडरुममध्ये कोणतेही धार्मिक ग्रंथ ठेवू नये.

7. बेडरुमला रंग देताना हलक्या रंगाचा विचार करावा. गडद रंग देऊ नये. गडद रंगांमुळे बेडरुममध्ये सकारात्मक उर्जा राहत नाही.

8. बेडरुममध्ये राधा कृष्णाची मूर्ती ठेवणं चांगले मानले जाते. यामुळे पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते.

9. बेड हा उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व अशा दिशेने ठेवू नये. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.

10. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू ही दक्षिण पूर्व दिशेने ठेवावी.