राज्य सरकारच्या प्रयत्नाला यश, वृंदावनमध्ये अडकलेले 90 भाविक परळीकडे रवाना

1764

परळी येथील काही भाविक वृंदावन येथे अडकलेले होते. अडकलेले हे भाविक आता परळीकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र अन उत्तर प्रदेशमधील प्रशासनात संवाद सुरू होता. राज्य सरकारच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. एका भाविकाने सेल्फी काढून दोन ट्रॅव्हल्स ने ते परळीकडे रवाना झाल्याचे सांगितले. येत्या48 तासात ते परळीत दाखल होतील.

परळी तालुक्यातील 90 भाविक भागवत कथा ऐकण्यासाठी वृंदावन उत्तर प्रदेश येथे गेले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हे भाविक काही दिवस तिथेच अडकले होते. हे भाविक आता पुढील 2 दिवसात परळीत दाखल होणार आहेत यासाठी महाराष्ट्र शासनाने उत्तर प्रदेश शासनाशी वेळोवेळी संपर्क साधला होता. दोन्ही राज्याच्या प्रशासनाच्या मदतीने हे सगळे 90 प्रवाशी परळीकडे रवाना झाले आहेत. आज सायंकाळी 7 वाजता ते रवाना झाले असून 48 तासात ते परळीत दाखल होणार आहेत. यासाठी प्रशासनाने 2 ट्रॅव्हल्स निघाल्या आहेत. एका प्रवाशाने सेल्फी काढून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हे सगळे भाविक अंदाजे गेला महिनाभर देवदर्शनासाठी उत्तर प्रदेश येथे गेले होते. मात्र लॉकडाऊन मुळे ते सर्वजण अडकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या