
एका हाताने जीवन जगणं खूप कष्टाचं असतं. तरी अनेकजण एका हाताने जिद्दीने असं आयुष्य जगत असतात. मालाड येथील एक पावभाजी विक्रेता देखील असेच एक जिद्दीचे उदाहरण ठरला आहे. या पावभाजी विक्रेत्याने त्याचा एक हात अपघातात गमावला मात्र तरीही तो डगमगला नाही. त्याने जिद्दीच्या जोरावर एका हाताने पावभाजीची गाडी चालवायला सुरुवात केली. तो एका हातानेच पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या चिरतो. एवढी मोठी पावभाजीची गाडी तो एकटा चालवतो. टायगर व्लॉग्स या फूड ब्लॉगरने या पावभाजी वाल्याची कहाणी जनतेसमोर आणली आहे.



























































