सावधान! विदर्भ कोरोनाच्या विळख्यात अडकतोय, रुग्णांची संख्या 14 वर, गोंदियातही शिरकाव

2439

विदर्भात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 झाली आहे. गोंदिया या दुर्गम भागातही कोरोनाने शिरकाव केला असून कोरोना बाधित एक रुग्ण आढळला आहे. राज्याच्या उपराजधानीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 136 वर गेला आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे. गुरुवारी सापडलेल्या पाचव्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्यासोबत दिल्लीला गेलेल्या कर्मचाऱ्यालाही दाखल करण्यात आलं होतं. एकाच कुटुबातील तिघांना व त्याच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले आहे. या रुग्णांना मेडिकल व मेयो रुग्णालयात भरती केले आहे.

दरम्यान, नागपुरातील पहिला रुग्ण बरा झाला असून त्याला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी आणखी चार रुग्णांची भर पडलयामुळे प्रशासन हादरले आहे. काल पॉझीटिव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कात जे लोक आले त्यांची तपासणी प्रशासनाने सुरु केली आहे. गोंदिया जिल्ह्यातही पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळला आहे. हा रूग्ण काही दिवसापूर्वी बॅकॉक येथून आला आहे.

विदर्भातील आकडेवारी- एकूण 14 रुग्ण
नागपूर – 9
यवतमाळ – 4
गोंदिया – 1

गोंदियात 1 पॉझिटिव्ह, 5 निगेटिव्ह
गोंदिया जिल्ह्यात 27 मार्चपर्यंत 129 जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले 613 व्यक्ती आढळून आल्या. त्यापैकी 1 जण विदेशातून आलेला होता, तो पाॅझिटिव्ह निघाला आहे.  तसेच एकूण 740 व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी 5 व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. श्याम निमगडे यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या