9 हजार कोटींच्या बदल्यात सरकारने 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केली- विजय मल्ल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बँकांना लुटून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या खर्चाचा तपशील उघड झाला आहे

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशी फरार झालेला लिकर किंग विजय मल्ल्या याने सरकारवर अधिक संपत्ती जप्त केल्याचे आरोप केले आहेत. मल्ल्या याच्यावर 9 हजार कोटी ठकवल्याचा आरोप आहे, पण आपली तब्बल 13 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं त्याने या आरोपात म्हटलं आहे. मल्ल्याने हे आरोप त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केले आहेत.

या ट्वीटनुसार, रोज सकाळी उठल्यानंतर मला कर्ज वसुली लवादाने केलेल्या नव्या जप्तीबद्दल कळतं. आतापर्यंत हिंदुस्थानातली माझी जेवढी संपत्ती जप्त करण्यात आली आहे, त्याची किंमत 13 हजार कोटींहून अधिक आहे. पण, माझ्यावर 9 हजार कोटींचा आरोप आहे. जर जप्त केलेल्या संपत्तीची किंमत जास्त असेल, तरीही मला अद्याप फरार घोषित केलं जाणार असेल आणि माझ्याविरुद्ध खटला भरवण्यात येत असेल, तर हा कुठला न्याय आहे, अशी विचारणा त्याने आपल्या ट्वीटमधून केली आहे.

त्याने अशाच प्रकारचा युक्तिवाद लंडन येथील न्यायालयात केला आहे. लंडन कोर्टात हिंदुस्थानात प्रत्यार्पणाला विरोध करताना त्याने हेच मुद्दे मांडले आहेत. जितक्या पैशांचं देणं होतं, त्याहून अधिक किमतीची संपत्ती सरकारने जप्त केली आहे. मग, आता मला फरार घोषित करून माझं प्रत्यार्पण होऊ नये, असं मल्ल्या याने लंडन कोर्टात म्हटलं आहे.