लंडनमध्ये बसून हिंदुस्थानला लुटतोय मल्ल्या, कसा ते वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या विविध बँकांना तब्बल ९,००० कोटीचा चुना लावून लंडनला पळालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या तिथे बसूनही देशाला लुटत आहे. ही लुटालूट प्रत्यक्ष नसली तरी देशाला आतापर्यंत सुमारे ६६ अब्ज रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.

मल्ल्या देश सोडून पळाल्यानंतर सेवा कर विभागातर्फे मल्ल्याच्या किंगफिशर एअर लाईनचे ए-३१९ हे विमान जप्त करण्यात आले होते. मल्ल्याचे हे आवडीचे विमान असून या मध्ये बेडरुम, डायनिंग रुम, शॉवर, ऑफिस, बार इत्यादी सोयींनी युक्त आहे.यातून काही प्रमाणात का होईना पण नुकसान भरपाई व्हावी म्हणून हे विमान लिलावासाठी ठेवले होते. पण या विमानाची खरेदी करण्यात कुणीच रस दाखवला नाही. त्यामुळे सध्या हे विमान, विमानतळ प्रशासनाच्या पार्किंगमध्ये उभे आहे.

एखादे विमान पार्किंग करायचे असल्यास ताशी १५,००० रुपये आकारले जातात. मात्र मल्ल्याचे विमान सरकारी विभागानेच जप्त केले असल्याने विमानतळ प्राधिकरणाचे रोजच लाखोंचे नुकसान होत आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाचे जवळपास, ६५,७०,००,००० रुपये बुडाले आहेत. तसेच यामुळे विमानतळ प्राधिकरणाची गैरसोय होत आहे. त्यामुळे मल्ल्याचे विमानही मल्ल्यासारखेच निघाले असून ही लूट कधी थांबणार असा प्रश्न प्राधिकरणाला पडला आहे.

दरम्यान, या बाबत मागील वर्षी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट लिमिटेड (एमआईएएल) कडून मुंबई उच्चन्यायालयात विमान हटविण्याची विनंती देखील करण्यात आली होती