सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
अवनी या नरभक्षक वाघिणीची हत्या केल्याचे प्रकरण अद्यापही गरमच आहे. यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाही करण्यात आली. या दरम्यान मुनगंटीवार यांनी पक्षातील माणूस कसा मोठा होणार नाही हे गेल्या आठ दिवसांपासून अनुभवत आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘अवनी या वाघिणीच्या मृत्यूनंतर आता मुनगंटीवार नावाच्या वाघाचा बळी घेण्याची तयारी सुरू आहे’, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.




























































