
सामना ऑनलाईन । मुंबई
छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या 10 व्या पर्वात विनिता जैन यांच्या रूपाने पहिली करोडपती मिळाली आहे. केबीसीच्या इतिहासातील त्या पाचव्या करोडपती आहेत.
विनिता यांनी 15 प्रश्नांच्या खेळामध्ये 14 प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटीचा टप्पा पार केला. 15 व्या आणि सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यामुळे त्यांनी खेळातून माघार घेतली. विनिता या आसामच्या रहिवाशी आहे. 2013 मध्ये बिझनेस ट्रिपला गेलेले त्यांचे पती बेपत्ता झाले. त्यानंतर एकटीने विनिताने आपल्या मुलांचा सांभाळ करत अहोत. गेली काही वर्षे त्यांनी भरपूर संघर्ष केला. आता ही रक्कम त्या डॉक्टर मुलाच्या क्लिनिकसाठी खर्च करणार आहेत. तसेच गोरगरीब मुलांसाठी कोचिंग क्लास सुरू करून त्या स्वतः शिकवणार आहेत.



























































