विराटने सचिन, धोनीला टाकले मागे ‘फोर्ब्स’च्या यादीत दुसरे स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

क्रिकेटमधील उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विराट कोहलीने 2018 या वर्षातील सर्वात श्रीमंत खेळाडू होण्याचा मान संपादन केला आहे. ‘फोर्ब्स इंडिया’ कडून बुधवारी श्रीमंत व्यक्तींच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. विराट कोहलीने या वर्षी 228.09 कोटींची कमाई करताना सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी या माजी सहकाऱ्यांना मागे टाकले आहे.

सचिन तेंडुलकरने 80 कोटी तर महेंद्रसिंग धोनीने 101.77 कोटींची कमाई केली आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने 36.5 कोटींसह सातवे स्थान पटकावले आहे.
सिने अभिनेता सलमान खान या यादीत पहिल्या स्थानावर असून विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.