प. रेल्वेची वाहतूक विस्कळीत; वाचा काय आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे वाहतुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळासाठी बिघडलेली होती. रेल्वे सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बिघाड दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून काम सुरु आहे.

चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या उपनगरीय गाड्या साधारणपणे वीस मिनिटं उशिरानं धावत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जलद आणि धीम्या अशा दोन्ही मार्गांना सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा फटका बसला आहे.