रेल्वे स्थानकांवर दोन रुपयांत शुद्ध पाणी मिळण्यावर गंडांतर

768

भारतीय रेल्वे स्थानकांवर कदाचित यापुढे प्रवाशांना दोन रुपयांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार नाही. कारण रेल्वे प्रशासनाकडून ही सुविधा बंद केली जाण्याची शक्यता आहे. सध्या रेल्वेस्थानकांवर 2 रुपयांमध्ये 300 मिलिलिटर पिण्याचे पाणी दिले जाते, मात्र ही सुविधा प्रकाशांना जरी फायदेशीर असली तरी ठेकेदारांना महागात पडत असल्याचे सांगितले जात आहे. आयआरसीटीसीने आता पश्चिम रेल्वेच्या 23 स्थानकांकर शुद्ध पाणी देण्याची ही सुविधा बंद केली आहे. याबाबत आयआरसीटीकडून एका पत्राद्वारे माहिती देण्यात आली.

शुद्ध पाणी सुविधा देणाऱ्या कंपनीने वीज व पाण्याचे बिल आतापर्यंत भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. हे बिल रेल्वेकडून कंपनीस देण्यात आले आहे. एवढेच नाही तर पाण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींकरून आयआरसीटीने आतापर्यंत ठोठावलेल्या दंडाची रक्कमदेखील कंपनीकडे थकीत असल्याचेही समोर आले आहे.

किरकोळ दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर 2015 मध्ये वॉटर वेंडिंग मशीन लावण्याची योजना सुरू करण्यात आली होती. या मशीनद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी दिले जात आहे. या मशीनद्वारे मिळणारे पाणी हे बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या