
सामना ऑनलाईन । अयोध्या
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या कायद्याचे समर्थन करीत मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने जर कायदा आणला तर त्याला आपला आक्षेप नसेल, असे स्पष्ट मत राम मंदिर प्रकरणातले मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारीं यांनी व्यक्त केले आहे.
We have no objection if an ordinance is brought for the construction of Ram Mandir. If bringing an ordinance will be good for the country, bring it. We are law abiding citizens, we’ll obey every law: Iqbal Ansari, Litigant in Ayodhya case pic.twitter.com/yKeYetOT9R
— ANI UP (@ANINewsUP) November 20, 2018
राम मंदिर उभारणीबाबत मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारींनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठीच्या कायद्याचे त्यांनी समर्थन केले आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने जर कायदा आणला तर त्याला आपला आक्षेप नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांनी अन्सारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, अन्सारी यांचे हे वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे. कारण अन्सारी यांनी यापूर्वी राम मंदिराचा तोडगा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली होती.
अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी सरकारने लोकसभेत विधेयक आणून त्या विधेयकाच्या माध्यमातून हे प्रकरण संपुष्टात आणले पाहिजे. सरकारने जरा कायदा केला तर आमचा आक्षेप नाही. आम्ही एकट्याने कायदा रोखू शकत नाही. भाजप सरकार चांगले काम करत आहे. आम्ही त्यांचे कौतुक करतो.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अयोध्येत मंदिराचे समर्थन करणाऱ्यांची गर्दी उसळते. अशावेळी काही दुर्घटना घडली तर येथील स्थानिक नागरिक काय करतील, असा सवाल इक्बाल अन्सारी यांनी केला.
अन्सारी यांच्या वक्तव्याचे स्वागतच -सत्येंद्र दास
इक्बाल अन्सारींच्या राम मंदिरावरील वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. सरकारने त्वरीत कायदा करुन मंदिराची उभारणी करावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे वडील हाशिम अन्सारी यांनीही अयोध्या वादासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नव्हता. मला वाटते इक्बाल यांच्या या वक्तव्यामुळे सरकारही अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा अध्यादेश काढण्यासाठी वेगाने पावले उचलेल,अशी प्रतिक्रिया अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी दिली आहे.



























































