वेबसीरीजची मदार साहित्यकृतीवर, कॉपीराईट मिळवण्यासाठी निर्मात्यांच्या उड्या

गेल्या काही दिवसांत वेबसीरीजची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. टीव्हीवरील मालिकांपेक्षा प्रेक्षकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरीजकडे वळवला आहे. आता प्रेक्षकांची वेबसीरीजची भूक भागवण्यासाठी निर्मात्यांनी आपला मोर्चा साहित्याकडे वळवला आहे. त्यामुळे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेतील साहित्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माती संस्था अबुनदंतियाने नुकतंच अश्विन संघी यांच्या ऐतिहासिक पौराणिक कांदबरी कीपर्स ऑफ द कालचक्रचे हक्क विकत घेतले आहेत. या पुस्तकावर आधारित वेबसीरीजची निर्मिती करणार आहेत.

अबुनदंतिया संस्थेने यापूर्वी एअरलिफ्ट, टॉयलेट एक प्रेमकथा, शंकुतला देवी या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसे ब्रेथ ऍन्ड ब्रेथ या वेबसीरीजचीही निर्मिती केली आहे.

निर्मात्या शीतल तलवार यांनी शशी थरूर यांच्या व्हाय आय ऍम हिंदू या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्सही वेबसीरीज विक्रम चंद्रा यांच्या साहित्यकृतीवर आधारित आहे. तसेच सिलेक्शन डे, बार्ड ऑफ ब्लड आणि लीला या वेबसीरीज या साहित्यकृतीवरच आधारित आहे. स्कॅम 1992 ही वेबसीरीज खूप गाजली होती. ही सीरीज सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्या पुसकावर आधारित होती.

नेटफ्लिकवरच बाहुबली बीफोर बिगनिंग ही वेबसीरीज येऊ घातली आहे. ही सीरीजही आनंद नीलकांतन यांच्या द राईस ऑफ शिवगामी यांच्या कांदबरीवर आधारित आहे.

मराठीतही हुतात्मा ही वेबसीरीज मीना देशपांडे यांच्या कांदबरीवर आधारित होती. तसेच स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांची समांतर ही वेबसीरीज सुहाश शिरवळकर यांच्या साहित्यकृतीवर आधारित होती. समांतरचा दुसरा सीजन लवकरच येणार आहे.

साहित्यकृतींचे हक्क विकत घेतल्याने लेखकाला मोठा आर्थिक फायदा होतो. हक्क घेण्यासाठी निर्मत्यांना 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत मोजावे लागता. पण ही रक्कम साहित्यकृतीचा विषय, लोकप्रियता आणि कलात्मकतेवर आधारित असते. कुठल्याही साहित्यकृतीसाठी कथा हा महत्त्वाचा भाग आसतो. कथा कांदबर्‍यातून आयता विषय मिळाल्याने निर्मात्याचे बरेच श्रम वाचतात. म्हणून अनेक निर्मात्यांनी साहित्य कृतीवर चित्रपट वेबसीरीज निर्मिती करण्यावर भर दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या