साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 9 ते शनिवार 15 ऑक्टोबर 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मौल्यवान वस्तू सांभाळा

मेष : मेषेच्या पराक्रमात मंगळ, सूर्य, चंद्र षडाष्टक. तारतम्य ठेऊन वक्तव्य करा. क्षेत्र कोणतेही असो तुमचा अंदाज चुकेल. नोकरीधंदा टिकवा. मौल्यवान वस्तू सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही डावपेच प्रभावी ठरणार नाहीत. प्रसंगावधान ठेवा. कुटुंबात तणाव, चिंता जाणवेल. स्पर्धा कठीण आहे. शुभ दिनांक :14, 15

योजना पूर्ण करा

वृषभ: वृषभेच्या धनेषात मंगळ, बुध, गुरू प्रतियुती. महत्त्वाच्या कामांना वेळ द्या. तत्परता ठेवा. गोड बोलून कार्य साध्य करा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. कठीण काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विचारांचा जय होईल. योजना पूर्ण करा. कुटुंबात चांगला निर्णय घ्याल. कला, साहित्यात पुढे राहाल. शुभ दिनांक :9, 15

नोकरीत फायदा होईल

मिथुन : ः स्वराशीत मंगळ, चंद्र, बुध त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या शेवटी दडपण येईल. प्रवासात घाई नको. नोकरीधंद्यात फायदा होईल. अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांची नजर तुमच्यावर आहे हे विसरून चालणार नाही. किरकोळ मतभेद होतील. गुंतवणूक करा. शुभ दिनांक : 9, 10

कार्याचे कौतुक होईल

कर्क :कर्पेच्या व्ययेषात मंगळ, शुक्र, शनि त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस उपयुक्त ठरेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचे काwतुक होईल. वर्चस्व सिद्ध होईल. कुटुंबातील अवघड समस्या सोडवता येतील. शुभ दिनांक : 9, 10

डावपेच योग्य प्रकारे टाका

सिंह : सिंहेच्या एकादशात मंगळ, चंद्र, बुध त्रिकोणयोग. रविवार, सोमवार मनाविरुद्ध घटना घडेल. नोकरीत वरीष्ठांचा दबाव राहील. तुमचा प्रभाव दाखवता येईल. धंद्यात टिकून राहाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी बातमी मिळेल. पुढील डावपेच योग्य प्रकारे तयार करा. शुभ दिनांक :11, 12

कठीण प्रश्न मार्गी लागेल

कन्या: कन्येच्या दशमेषात मंगळ, बुध, गुरू प्रतियुती. किरकोळ तणाव न वाढवता तुमच्या ध्येयावर लक्ष पेंद्रित करा. चौफेर यश लाभेल. लोकप्रियता मिळेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे वाटचाल कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण प्रश्न मार्गी लागेल. मानसन्मान, आर्थिक साहाय्य मिळेल. स्पर्धेत यश मिळेल. शुभ दिनांक : 9, 14

प्रतिष्ठा सांभाळा

तुळ :  तुळेच्या भाग्येषात मंगळ, शुक्र, हर्षल षडाष्टक योग. शारीरिक, मानसिक दडपण येईल. मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरी टिकवा. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. प्रतिष्ठा टिकण्यासाठी प्रयत्न करा. कायदा सांभाळा. प्रवासात सावध रहा. शुभ दिनांक : 11, 12

अडचणींवर मात करा

वृश्चिक : वृश्चिकेच्या अष्टमेषात मंगळ, बुध, गुरू प्रतियुती. क्षुल्लक अडचणींवर मात करून महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. नोकरीधंद्यात फायदा होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण प्रश्नावर तोडगा काढता येईल. कौटुंबिक समस्या सोडवा.
शुभ दिनांक : 9,10

चौफेर सावध रहा

धनु : धनुच्या सप्तमेषात मंगळ, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. वादाचा, तणावाचा प्रसंग येईल. चातुर्याने मात करू शकाल. चौफेर सावध रहा. नोकरीधंद्यात प्रगती कराल. नविन परिचय फायद्याचा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक कलाटणी देणारी घटना घडेल. लोकप्रियता वाढेल. आर्थिक साहाय्य मिळवा. शुभ दिनांक : 10, 12

योग्य निर्णय घ्या

मकर : मकरेच्या षष्ठेषात मंगळ, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या सल्ल्याची, मदतीची अपेक्षा इतरांना राहील. वर्चस्व वाढेल. नोकरीधंद्यात योग्य निर्णय घ्या. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. तुमच्या चातुर्याचे, बुद्धीचे व धाडसाचे कौतुक होईल. तुमच्या क्षेत्रात अग्रेसर राहाल. कुटुंबात चांगली घटना घडेल. शुभ दिनांक :9, 10

संयमी भूमिका ठेवा

कुंभ:  कुंभेच्या पंचमेषात मंगळ, सूर्य चंद्र षडाष्टक योग. मनोबल टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रकृतीची काळजी घ्या. संयम, सहनशीलता, दूरदृष्टिकोन ठेवा. नोकरीत काम वाढेल. धंद्यात खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज वाढेल. मदत करणारे दूर जातील. कुठेही अरेरावी नको. शुभ दिनांक : 9, 10

प्रत्येक दिवस यश देणारा

मीन : मीनेच्या सुखेषात मंगळ, बुध गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस यश देणारा आहे. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कठीण काम करून घ्या. प्रतिष्ठा, जनसंपर्क यात प्रगतीकारक घटना घडेल. तुमचे सर्वत्र कौतुक होईल. जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येईल. शुभ दिनांक : 11, 12