
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 77 आमदार जिंकून आले होते. मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यांतच भाजपला गळती लागली आहे. कालीगंज मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुमन रॉय यांनी पक्षाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते चौथे आमदार आहेत.
तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चटर्जी यांनी भाजप आमदार सुमन रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर सुमन रॉय यांनी निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करणे आपली सर्वात मोठी चूक होती असे म्हटले. तसेच अनेक लोक भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले.
I had to contest from Kaliaganj on the BJP ticket due to some circumstances. But my soul and heart belong to TMC. I joined the party again to support CM Mamata Banerjee’s efforts. I am apologetic to party for the time I was not here: BJP MLA Soumen Roy after joining TMC pic.twitter.com/5l3C2ALzYQ
— ANI (@ANI) September 4, 2021
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यानंतर भाजपाला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. विष्णुपूरचे भाजप आमदार तन्मय दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. मुकुल रॉय यांनी निवडणुकीनंतर घरवापसी केली होती.



























































