नीती आयोगाच्या बैठकीला ममता बॅनर्जी राहणार अनुपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

15 जून रोजी दिल्लीमध्ये नीती आयोगाने एका बैठकीचे आयोजन केले आले आहे. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

ममता दीदींनी पत्रात म्हटले की, “नीती आयोगाकडे कुठलेच वित्तीय अधिकार नाही तसेच राज्यांना मदत करण्यासाठी सुद्धा कुठलेच अधिकार नाही,” तेव्हा अशा बैठकीला उपस्थित राहणे हे माझ्यासाथी निरर्थक असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बॅनर्जींनी वारंवार केंद्र सरकारला लक्ष्य केले. बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळाल्या होता. 2014  मध्ये भाजपला फक्त दोनच जागांवर यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने दीदींच्या गडाला सुरुंग लावला आहे.  निवडणुकीपूर्वी आणि नंतर तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकतंच भाजपनेते मुकुल रॉय यांचे पुत्रानेही तृणमूलची साथ सोडून भाजपमध्ये डेरेदाखल झाले. नेत्यांच्या आऊटगोईंगमुळे सत्ताधारी तृणमूलची डोकेदुखी वाढली आहे.