
व्हेल माशाची उलटी विकण्याच्या तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वैभव कालेकर (25) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडील 616 किलो वजनाची उलटी हस्तगत केली आहे.
मरीन ड्राइव्ह येथील देवरा चौक परिसरात एक तरुण व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची खबर प्रॉपर्टी सेलला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दापोली येथे राहणारा वैभव कालेकर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन कोटी 60 लाख किमतीची व्हेल माशाची उलटी सापडली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी वैभवला मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.





























































