
गेल्या काही महिन्यांपासून WhatsApp मल्टीपल अकाउंट लॉगिन फीचर टेस्ट करत आहे. हे फीचर आता सर्वांसाठी जारी करण्यात आले आहे. या फीचरमुळे आता यूझर्स आपले अकाउंट सेकेंडरी डिवाइस कनेक्ट करू शकतात. याकरिता त्यांच्या प्राइमरी डिवाइसमध्ये इंटरनेटची आवश्यकता देखील नाही.
हे फीचर कंपनी अधिकृतरित्या बीटा लेबल सोबत देत आहे. WhatsApp साठी नव्या अपडेटसह हे फीचर तुम्ही पाहू शकतात. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही व्हर्जनध्ये जारी करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप काही महिन्यापासून या फीचरच्या टेस्टिंगवर काम करत आहे. या फीचरमुळे आता स्मार्टफोनमध्ये इंटरनेट नसलं किंवा तो ऑनलाइन नसला तरी यूझर्स सेकेंडरी डिवाइसमधून मेसेज सेंड आणि रिसिव्ह करू शकतात.
हे फीचर WhatApp च्या लेटेस्ट अपडेटसह सर्व यूझर्ससाठी आता जारी करण्यात येत आहे. याआधी व्हॉट्सअॅप वेब यूज करण्यासाठी मेन डिवाइसमध्ये इंटरनेट कनेक्शन जरूरी होतं.
हे फीचर आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेबल करण्यासाठी तुम्हाला हे फीचर ऑप्ट करावे लागेल. सध्या त्याला बीटा लेबल करण्यात आले आहे. एकदा अनेबल करण्यात आल्यावर आधीचे डिवाइस देखील अनलिंक होउन जातील.
यानंतर तुम्हाला हे अकाउंट पुन्हा लिंक करावे लागेल. आता आपल्या पीसीवरून देखील तुम्ही व्हॉट्सअॅप यूझ करू शकाल. तेही प्रायमरी डिवाइस इंटरनेटला कनेक्ट नसले तरी शक्य आहे. हे सर्व मेसेज आणि कॉल्स एन्क्रिप्टेड असतील.




























































