
चालण्याचा व्यायाम हा आपल्या शरीरासाठी फार गरजेचा मानला जातो. चालण्यामुळे आपले वजन कमी होण्यासोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. उत्तम आरोग्यासाठी चालणे हे सर्वात उत्तम मानले जाते. परंतु कोणत्या वेळेला चालावे हा मात्र प्रश्न पडतो. चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. सकाळी चालण्यामुळे आपले एकूण फिटनेस आणि आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो. तज्ञांच्या मते, हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या जुनाट आजारांचा धोका चालण्यामुळे कमी होतो.
सकाळी चालण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे फिरायला जाण्यामुळे चरबी जळण्यास मदत होते. संध्याकाळी मात्र चालण्याचे फायदे हे खूप कमी आहेत.
सकाळी चालल्याने आपल्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे आपल्याला सतर्क आणि उत्साही राहण्यास मदत होते.
मॉर्निंग वॉक झोपेचे नियमन करण्यासाठी उत्तम आहे. यामुळे मेलाटोनिन हार्मोनच्या स्रावात मदत करतात.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो.
संध्याकाळी चालण्याचे फायदे
संध्याकाळी चालायला जात असाल तर, ताण आणि चिंता कमी होतात.
मूड सुधारण्यासाठी संध्याकाळी चालणे हे खूप हितावह मानले जाते. संध्याकाळी चालण्यामुळे चिंता आणि नैराश्य कमी व्हायला मदत होते.