
कोरोना जीवितहानीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. या संकटात असंख्य लहान मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली. त्यामुळे या अनाथ मुलांच्या भवितव्याचे काय? त्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राज्यातील अनेकांना कोरोनामुळे आपले पालक गमावावे लागेल असून अशा अनाथ मुलांची संख्या सुमारे 1450 च्यावर झाली आहे. या अनाथ मुलांपर्यंत मदत पोहचणार कधी व कशी, असा सवाल करत पुण्याच्या सनाथ वेल्फेअर फाऊंडेशनने जनहित याचिका दाखल केली आहे.


























































