उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून 3 सोप्या गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळाचा त्रास माणसांसह अन्न पदार्थांनादेखील होतो. उन्हाळ्यात अन्न पदार्थ लवकर खराब होतात. सूर्य प्रकाश किंवा उष्णतेमुळे शिजवलेले अन्न आंबतात. मुख्य म्हणजे दूध फाटते किंवा नासते. दूध तापवून घेतल्यानंतरही ते लवकर फाटते.
काही लोकं नासलेल्या दुधाचे विविध पदार्थ करतात. पण दूध फाटू नये असे आपल्याला वाटत असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. या ट्रिकमुळे अति उष्णतेतही दूध चांगले टिकून राहील, व खराब ही होणार नाही.

काचेची बाटली किंवा जगमध्ये ठेवा दूध
उन्हाळ्यात दूध फाटू नये असे वाटत असेल तर, दुधाला काचेच्या बाटलीत किंवा जगमध्ये साठवून ठेवा. या भांड्यांमध्ये दूध चांगले टिकून राहते. दूध साठवून ठेवण्यापूर्वी उकळून थंड करा. नंतर थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. त्यावर कॅप किंवा झाकण लावायला विसरू नका. यामुळे ऐन उन्हाळ्यातही दूध फाटणार नाही.

दूध साठवण्यासाठी आपण प्लास्टिक कॅनचा वापर करू शकता. प्लॅस्टिक कॅनमध्ये दूध साठवण्यासाठी प्रथम दूध उकळून थंड करा. त्यानंतर त्यात दूध साठवून ठेवा. या ट्रिकमुळे दूध तीन ते चार दिवस आरामात टिकून राहेल, लवकर खराब होणार नाही.

स्टीलच्या भांड्यात दूध साठवा
दूध साठवण्यासाठी आपण स्टीलचे भांडे वापरू शकता. या भांड्यात दूध साठवून ठेवल्याने ते लवकर खराब होणार नाही. त्याचप्रमाणे दुधाची चवही तशीच राहते, ती बदलत नाही. स्टीलच्या भांड्यात दूध साठवण्यापूर्वी स्टीलचं भांडं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या