
अनैतिक संबंध असलेल्या एका महिलेने आपल्या पतीच्या गुप्तांगावर फीनेल ओतल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकाराने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नवभारत टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे ही घटना घडली आहे. नीता (नाव बदलले) हिचे एका डॉक्टर सोबत अनैतिक संबंध होते. डॉक्टर नेहमी तिच्या घरी येताना तिच्या तीन मुलींसाठी खाऊ घेऊन येत असे. तो खाल्ल्यानंतर मुली बेशुद्ध पडत असत. असं खूप वेळा झाल्यावर मुलींनी ही तक्रार आपल्या वडिलांकडे केली. नीताच्या नवऱ्याने याचा जाब तिला विचारला. त्याचा नीताला खूप राग आला होता.
रागाच्या भरात तिने त्याच्या नकळत त्याच्या गुप्तांगावर फिनेल टाकलं. फिनेलमुळे जळजळ होऊन पुरळ आल्याने पतीला हा त्वचा रोग असावा असं वाटलं आणि तो उपचार करत राहिला.
मात्र, त्याला एक दिवस सत्य समजलं आणि खूप धक्का बसला. त्या भरात त्याने तो काम करत असलेल्या कंपनीत गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नीता आणि तिच्या डॉक्टर प्रियकराला अटक केली आहे.
























































