
सामना ऑनलाईन, लंडन
सध्या इंग्लंडमध्ये विम्बल्डन ही प्रतिष्ठेची टेनिस स्पर्धा सुरू आहे. मात्र या स्पर्धेतील लढतीवर फुटबॉल वर्ल्ड कपच्या लढतींचा प्रभाव पडू लागलाय. इंग्लंडच्या फुटबॉल संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे आता विम्बल्डनच्या उपांत्य फेरीच्या तसेच फायनलच्या लढतीच्या वेळेत बदल करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण ऑल इंग्लंड फुटबॉल क्लबचे सीईओ रिचर्ड लुईस यांनी सामन्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला.
इंग्लंड पुन्हा जिंकणार – जेफ हर्स्ट
गॅरेथ साऊथगेटच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडचा फुटबॉल संघ वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करतोय. हॅरी केनचा हा संघ १९६६ सालानंतर देशाला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे इंग्लंडच्या १९६६ सालातील वर्ल्ड चॅम्पियन संघातील हीरो जेफ हर्स्ट यांनी.
भीती स्टार्लंगची
मॉस्को : झ्लॅटको डॅलीच यांच्या प्रशिक्षणात क्रोएशियाने वर्ल्ड कपमध्ये आपला ठसा उमटवला आहे. पण रहीम स्टार्ंलग याच्या अफलातून खेळाच्या जोरावर मँचेस्टर सिटीने ईपीएल जिंकली. त्यामुळे हॅरी केनसह रहीम स्टार्लंग याला रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे डॅलीच म्हणाले.




























































