बलात्काराचा प्रयत्न करत होता नराधम, महिलेने कापले गुप्तांग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करत होता, तेव्हा महिलेने त्याचे गुप्तांगच कापले. मध्य प्रदेशमधील ही घटना असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात एक 45 महिला आपल्या पती आणि मुलासह राहत होती. महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेले होता. गुरूवारी रात्री दीडच्या सुमारास एक व्यक्ती महिलेच्या घरात घुसला, घरात चोर घुसला असेल म्हणून घाबरून महिलेन आपल्या मुलाला बाहेर सोडले. नंतर त्या व्यक्तीने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेने खाटेखाली असलेला विळा घेतला आणि त्याचे गुप्तांग कापले. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.