मिसकॉलवरून प्रेम जुळलं, पहिल्या नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या काळासोबत प्रेम जुळण्याची माध्यमं बदलत गेलेली आपण पाहिली आहेत. पूर्वी एका नजरेत होणारं प्रेम आताच्या जगात सोशल मीडियाच्या माध्यमातून फुलत आहे. पण, उत्तर प्रदेशमध्ये फक्त एका मिसकॉलवर प्रेम जुळल्याने एक विवाहिता प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे रानी (बदललेले नाव) आणि रमेश (बदललेले नाव) हे जोडपं राहतं. त्यांना दोन मुलंही आहेत. पाच महिन्यांपूर्वी रानीच्या मोबाईलवर एक मिस कॉल आला. रानीने समोरून त्या नंबरवर कॉल केला, तेव्हा तिची ओळख राजू (बदललेले नाव) या तरुणाशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. हळू हळू त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

रानी राजूच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की, ती 16 सप्टेंबर रोजी फिरोजाबाद येथे पळून गेली. राजू तिला रसूलपूर येथे त्याच्या घरी घेऊन गेला. त्यांनी तिथे विधीपूर्वक लग्नही केलं आणि ते दोघंही जोडप्यासारखे राहू लागले. दरम्यान, आपली पत्नी पळून गेल्याने रमेशने पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी रानीचा शोध घेतला.

रानी फिरोजाबाद येथे असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी रमेशला सोबत घेऊन फिरोजाबाद गाठलं आणि थेट राजूच्या घरी धाड टाकली. तिथे अखेर राजूच्या घरी रानी सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.